निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजे: “काजवा महोत्सव”
जसजसा पावसाळा जवळ येतो, तसतसे महाराष्ट्रातील fireflies festival खुले होतात.
दरवर्षी मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रात एक जादुई घटना घडते, जी स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना मोहित करते. fireflies festival, ज्याला काजवा फेस्टिव्हल म्हणूनही ओळखले जाते, पावसाळ्याची सुरुवात आणि या आकर्षक कीटकांच्या मंत्रमुग्ध चमकाने साजरा केला जातो.
हिंदीमध्ये “जुगनू” आणि मराठीत “काजवा” या नावाने ओळखले जाणारे fireflies त्यांच्या bioluminescent चमकाने कल्पनाशक्तीला मोहित करतात. हे लहान कीटक संध्याकाळच्या वेळी जोडीदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या प्रकाशाचा वापर करून, एक भव्य देखावा तयार करतात.
Fireflies Festival 2023: जून महिना चालू झाला कि सर्वांना पावसाचे वेध लागतात आणि त्याच बरोबर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत काजवांच्या मिलनाचा उत्सव सुरू होतो. जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी प्रकाशनिर्मितीची ही कला निसर्गाने काजव्याला दिली आहे. काजव्यांच्या लुकलुकण्यामुळे झाडांना दिव्यांची माळ घातली की काय असे वाटते. शहरी नागरिकांना व पर्यटकांना निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार दाखविण्यासाठी अनेक पर्यटन संस्था काजवा महोत्सवांचे आयोजन करतात.
काजवांचे लुकलुकणे एक विलोभनीय दृष्य
काजवा हा कणा नसलेला कीटक आहे. निशाचर असल्याने काजवे रात्रीच्या वेळी सक्रिय होतात. नर काजव्यांच्या पाठीवर दिव्यांप्रमाणे लुकलुकणारा प्रकाश बघायला मिळतो. जैविक कचरा विघटन, परागीभवनामध्ये काजव्यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
काजवा कसा चमकतो?
काजवे त्यांच्या शरीरात एक रासायनिक प्रतिक्रिया तयार करतात ज्यामुळे त्यांना प्रकाश मिळू शकेल. काजव्यांमध्ये रासायनिक प्रक्रियेतून प्रकाश निर्माण होतो. हा प्रकाश जैविक प्रकारचा असतो. काजव्यांच्या पोटात मॅग्नेशियम, प्राणवायू, लुसिफेरस आणि लुसिफेरीन यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाश निर्मिती होते.
काजवा त्याच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियेची सुरुवात व शेवट निश्चित करू शकतो ही सर्व क्रिया त्याच्या प्रकाश अवयवात होते. काजव्याच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियेत जेव्हा ऑक्सिजन मिसळतो तेव्हा प्रकाश तयार होतो व जेव्हा ऑक्सिजन उपलब्ध नसतो तेव्हा प्रकाश बंद असतो म्हणून आपल्याला काजवा लुकलुकताना दिसतो.
दमट वातावरण काजव्यांच्या मिलनासाठी पोषक
पावसाळ्यापूर्वीचे म्हणजेच मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जे दमट वातावरण तयार होत ते काजव्यांच्या मिलनासाठी पोषक असते. या महिनाभराच्या कालावधीत ढग दाटून आलेले असतात, त्यामुळे वातावरण दमट होते, . याच दिवसांमध्ये पश्चिम घाटातील रानावनात, जंगलात काजव्यांचे मिलन होते. रात्री काजव्यांच्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात झाडांच्या फांद्या उजळतात. मिलनानंतर काही दिवसातच मादी पाणथळ जागेत अंडी घालते आणि पुढील पिढी जन्माला येते.
प्रामुख्याने आयोजित होणारी काजवा महोत्सवाची ठिकाणे
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा काजवा महोत्सव दर वर्षी भंडारदरा भागात होतो. वेगवेगळ्या भागांतून पर्यटक, निसर्गप्रेमी या महोत्सवात सहभागी होतात. भंडारदरा , पांजरे, उडदावणे, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात, रंधा धबधब्याजवळ, भीमाशंकरचा काही भाग, ताम्हिणी अभयारण्य, पौड-मुळशी लोणावळ्यातील राजमाची वनक्षेत्र ही काजवा महोत्सवाची ठिकाणे आहेत. यंदाही गेल्या आठवड्यापासून काजवा महोत्सव सुरू झाले आहेत .
काजव्यांचा अधिवास धोक्यात
मुख्यतः हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा मुक्काम असतो; पण गेल्या काही वर्षांत वृक्षतोड आणि वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे काजव्यांचा अधिवास धोक्यात आला आहे.
पर्यटकांचा वाढता उपद्रव
काजव्यांचा आकर्षणामुळे दर वर्षी महोत्सवातील पर्यटकांची गर्दी वाढते. काजव्यांना बघण्यासाठी लोक जंगलात गाड्या घेऊन जातात. काजव्यांनी बहरलेल्या झाडांवर गाडीचे दिवे, बॅटरीचे झोत टाकतात. चांगले फोटो मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. झाडांखाली गोंधळ करतात. पर्यटकांच्या या वागण्यामुळे काजव्यांना त्रास होतो.